बेंद्रे हॉस्पिटल, प्रसूतिगृह,अँडव्हान्स्ड लैपरोस्कोपिक सर्जरी व टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या विषयातील अहमदनगर जिल्ह्यातील एक नामांकित रुग्णालय आहे. आतापर्यंत या रुग्णालयात हजारो स्त्रियांची सुखरूप प्रसूती होऊन त्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे.सर्वांत महत्वाचे म्हणजे यापैकी ८०% स्त्रियांची सुलभ प्रसूती झाली आहे. काळाच्या गरजेप्रमाणे होणाऱ्या चिकित्सा व उपचार पद्धतीमधील बदलांना आत्मसात करून घेऊन त्या सर्व सुविधा आपल्या रुग्णांना उपलब्ध करून देणे हे बेंद्रे हॉस्पिटल चे पमुख वैशिष्ट्य आहे. म्हणूनच स्त्रियांवर केल्या जाणाऱ्या अँडव्हान्स्ड लैपरोस्कोपिक सर्जरी ,बेंद्रे हॉस्पिटल ने अहमदनगर शहरात सर्वप्रथम सुरु केल्या व आजपर्यंत हजारो गरजू रुग्णांवर या शस्त्रक्रिया बेंद्रे हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे करण्यात आलेल्या आहेत.
आजकाल बऱ्याच जोडप्यांना वन्ध्यत्वाच्या समस्येला सामोरे जावे लागते.या समस्येवरील शेवटचा पर्याय म्हणून टेस्ट ट्यूब बेबी या उपचार पद्धती कडे बघितले जाते. परंतु १० वर्षांपूर्वी हि उपचार पद्धती केवळ पुणे किंवा मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध असून ती एक अतिशय महागडी उपचार पद्धती म्हणून कुप्रसिद्ध होती. याचे भान ठेवून व रुग्णांची गरज ओळखून बेंद्रे हॉस्पिटल ने अहमदनगर शहरामध्ये सर्वांत उत्कुष्ट प्रकारची टेस्ट ट्यूब बेबी लेबॉरेटरी सुरु केली. आणि आज मला येथे अभिमानाने नमूद करावेसे वाटते कि आजपर्यंत बेंद्रे हॉस्पिटल मधील या उपचारपद्धतीचा फायदा होऊन ५०० च्या वरती जोडप्यांना आपत्यप्राप्ती झाली आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे बेंद्रे हॉस्पिटल मधील टेस्ट ट्यूब बेबी या उपचार पद्धती ची सुविधा हि महाराष्ट्रातील सर्वांत स्वस्त दरातील उपलब्ध असणाऱ्यांपैकी एक आहे. म्हणूनच आज बेंद्रे हॉस्पिटल मध्ये अगदी लांबून म्हणजे अगदी पुणे ,मुबई, मराठवाड्यातील अनेक जिल्हे व इतर राज्यातील हि अनेक रुग्ण टेस्ट ट्यूब बेबी च्या उपचारांसाठी दाखल होतात.
या वाटचालीतील पुढील एक पाऊल म्हणून बेंद्रे हॉस्पिटल मध्ये आम्ही एक अत्याधुनिक फोर डी कलर डॉप्लर व सोनोग्राफी मशीन आणले आहे.(VOLUSON GE –E-6)
बेंद्रे हॉस्पिटल मध्ये आधीपासूनच इतर दोन कलर डॉप्लर मशिन्स आहेत. परंतु तपासणीसाठी आलेल्या गरोदर स्त्रिया तसेच स्त्रीरोग विभागातील इतर आजार व वन्ध्यत्व असलेल्या रुग्णांच्या आजाराचे आजून अचूक निदान होण्याकरता हे मशीन हॉस्पिटलने विकत घेतले आहे. या मशीनचा वापर सुरु करण्याचे औपचारिक उदघाटन नुकतेच बेंद्रे हॉस्पिटल मध्ये पार पडले.
या मशीनची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत
१) डॉक्टरांना गरोदर स्त्रीच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाच्या वाढीचे व त्याच्या शक्य असणाऱ्या व्यंगांचे अचूक व लवकर निदान करता येते.थ्री डी व फोर डी या प्रणालीचा वापर करून गर्भाच्या सूक्ष्म अवयवांचे अचूक रित्या निरीक्षण करून व्यंग असेल तर अचूक निदान करण्यास मदत होते. तसेच कलर डॉप्लर या प्रणालीचा वापर करून गर्भाच्या वाढीचे योग्य रित्या अवलोकन करता येते. याशिवाय गरोदर स्त्रीला स्वतःला व तिच्या नातेवाईकांना पोटात वाढणाऱ्या बाळाचे अगदी हुबेहूब फोर डी चित्र बाळाच्या जन्माअगोदरच बघता येते. यासाठी बेंद्रे हॉस्पिटल मध्ये सोनोग्राफी रुम मध्ये रुग्णाच्या पायाच्या बाजूला एक मोठा स्क्रीन लावलेले आहे. या स्क्रीन मध्ये सोनोग्राफी सुरु असताना गरोदर स्त्रीस स्वतःचे बाळ सहज दिसू शकते.
२)स्त्रीरोग विभागातील आजार जसे गर्भाशयाला किंवा बीजांडाशयाला येणाऱ्या गाठीचे लवकर व अचूक निदान करता येते.
३) वन्ध्यत्व असणाऱ्या रुग्णाच्या बीजग्रन्थि मध्ये वाढणाऱ्या बीजांची संख्या व प्रतवारी कशी आहे याचे अचूक निदान तसेच गर्भाशयाच्या आतील अस्त्रराची जाडी व प्रत कशी आहे याचे अचूक निदान करता येत असल्यामुळे टेस्ट ट्यूब बेबीचे उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा खूप फायदा होतो.
ही फक्त मशीन नाही तर “मातृत्वाचे वरदान”
Categories:
Uncategorized