बेंद्रे हॉस्पिटलच्या शिरपेचात “लक्ष्य मान्यता” हे मानाचे नामांकन प्राप्त

अहमदनगरमध्ये रहात असाल तर डॉ. अनिल बेंद्रे आणि डॉ. स्मिता बेंद्रे यांचं बेंद्रे हॉस्पिटल तुम्हा सगळ्यांना माहीतच असणार… नेहमीच वेगवेगळ्या मानांकनांनी गौरवल्या जाणाऱ्या ह्या अहमदनगरच्या हॉस्पिटलला “लक्ष्य मान्यता” हे आणखी एक मोठं मानांकन प्राप्त झालं आहे आणि त्यामुळे बेंद्रे हॉस्पिटल आणि तिथल्या स्टाफ साठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे.
हे मानांकन मिळणं खूप मोठी गोष्ट आहे कारण माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सरकारी तसेच खाजगी रुग्णालयातील प्रसुती सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘लक्ष्य मान्यता’ हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून प्रसुती सेवेचा दर्जा अधिक उंचावतो आणि त्याच बरोबर ज्या हॉस्पिटलला ते मानांकन मिळालं आहे त्या हॉस्पिटलला त्या क्षेत्राबाबत अतिशय सजग व उत्तम मानलं जातं.
ह्या “लक्ष्य मान्यता” उपक्रमाच्या सुरुवात करण्याविषयी बोलणं झालं, तर सार्वजनिक आरोग्य विभाग व फॉग्सी म्हणजेच फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्य मान्यता उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये प्रसुतीदरम्यान आणि प्रसुतीपश्चात गुणात्मक सेवा याबाबत महिलांच्या सुरक्षित प्रसुतीसाठी तसेच खाजगी संस्थांमध्ये सेवांचा दर्जा सुधारून प्रसुतीदरम्यान होणाऱ्या माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लक्ष्य मान्यता उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रसुतीदरम्यान आणि प्रसुती पश्चात गुणात्मक सेवा उपलब्ध करून माता व नवजात बालकांचे होणारे मृत्यू कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

‘लक्ष्य मान्यता’ दर्जात्मक सेवा मानांकनाचा अवलंब करण्यासाठी नोंदणीकृत रूग्णालयांना दर्जात्मक सेवेच्या 26 मानकांवर आधारित रूग्ण काळजी, सुरक्षितता, गुणवत्ता व सुविधा सुधारणे याबाबत प्रशिक्षण देण्यात येऊन खाजगी प्रसुती रुग्णालयांमध्ये गुणवत्ता मानकांना चालना देण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. या उपक्रमामुळे माता व बालकांना गुणात्मक सेवा उपलब्ध होण्यास मदत होते.
त्यातच बेंद्रे हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या हॉस्पिटल मध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त महिलांची शक्यतोपरी नॉर्मल डिलीवरी करण्याचाच प्रयत्न केल्या जातो.
ह्या मानांकणामुळे आज बेंद्रे हॉस्पिटलच्या ख्यातीत वाढच झाली आहे. आपल्या समाजात प्रसूती दरम्यान महिलांना योग्य ती ट्रीटमेंट मिळावी म्हणून आजही बेंद्रे हॉस्पिटल आपली गुणवत्ता टिकवून आहे ! अशीच आणखी मानांकनं मिळवत बेंद्रे हॉस्पिटल आपली व समाजात महिलांच्या सुरक्षित प्रसुतीसाठी प्रगती करेल !